अग्नीपुजा
अग्निपूजा > धर्म > अग्निपूजा अग्निदेवता: दक्षिण भारतातील एक काष्ठतक्षण. अग्निपूजा : जगातील निरनिराळ्या खंडामध्ये ज्या प्रथमिक संस्कृती गेल्या दीडशे वर्षांत आढळल्या, त्यांच्यातील बऱ्याच अग्निपूजक आहेत. अग्नी हा राक्षस व पिशाच यांचा निवारक व पापनाशक आहे, अशी त्यांची परंपरागत समजूत आहे. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांतही अग्निस पवित्र व पापनिवारक शक्ती म्हणून सांभाळण्याची परंपरा होती. हिब्रूंच्या धर्मग्रंथात अग्नीचा महिमा वर्णिलेला नसला, तरी ते देवाची पूजा व प्रार्थना करताना देवाला अर्पण करावयाचे पदार्थ वेदीवरील अग्नीत टाकीत असत. पंचभूततत्त्वांपैकी तिसरे भूततत्त्व व त्याची अधिष्ठात्री देवता, केवल अग्नी, विशेषणविशिष्ट अग्नी व अन्य देवतांसहित अग्नी, ही चारही वेदांमिळून २,४९१ मंत्रांची देवता आहे. अतिथी, कवितम, दूत, पुरोहित, हव्यवाट् इ. शेकडो गुणबोधक विशेषणे वेदमंत्रांत आहेत. काही मंत्रांचा अग्नी हा ‘ऋषी’ आहे. हा सर्व देवांचे मुख तसेच त्यांचा दूत आहे. वेदमंत्रांत व स्मृतींत वृषभ व मनुष्य यांच्या संमिश्र रुपाने याचे वर्णन केले आहे, ते असे : चार शिंगे, तीन पाय, दोन मस्तके, सात...